हिंगोली : पनवेल येथे मायलेकीचा खून करून फरार झालेल्या आरोपीने तालुक्यातील वैजापूर शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ३ वाजेच्या रुग्णारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती आशी की, कळमनुरीतील रुपूर येथील सिद्धार्थ बलखंडे हे त्यांच्या कुटुंबीयांसह पनवेल येथे एका चाळीमध्ये राहातात. याच भागात हिंगोली तालुक्यातील पहेणी येथील २५ वर्षीय तरूण प्रकाश यशवंत मोरे एकटाच राहत होता. प्रकाशने सिद्धार्थ यांची मुलगी सुजाता बलखंडेसोबत लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र सिद्धार्थ लखंडे यांनी त्याला विरोध केला.
दरम्यान, सुजातासोबत विवाहाला नकर दिल्यानंतर प्रकाश मोरे याने १९ फेब्रुवारीला प्रकाशने सुजाताची आई सुरेखा बलखंडे (३७) आणि सुजाता (१८) यांचा खून करून पळ काढला. दरम्यान, आरोपी प्रकाशने हिंगोली तालुक्यातील वैजापूर शिवारात गळफास घेतल्याचे समोर आले. यानंतर नर्सी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गिरी आदींनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच, प्रकाशच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; ५१५ नव्या रुग्णांची भर, ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
- जालनेकरांनो नियम पाळा; ९६ नवे बाधित रुग्ण, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू
- परभणीत आढळले २१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू
- ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा