नियमानुसारच मुलीला शासकीय शिष्यवृत्ती – बडोले

minister rajkumar badole

राज्य असो वा केंद्र सरकार प्रत्येकाकडून वेगवेगळ्या गोष्ठीवरील सबसिडी सोडावी म्हणून आवाहन केल जात. नागरीकही त्याला प्रतिसाद देत गॅस तसेच इतर सबसिडी सोडतात. मात्र असे आवाहन करणाऱ्या सरकारमधील मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. सामाजिक न्यायमंत्री असणारे राजकुमार बडोले यांच्या मुलीला परदेशात शिकण्यासाठी शासनाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बाब समोर आली आहे.

मंत्र्यांनी तर याचा फायदा घेतलाच मात्र अधिकारीही यात मागे नाहीत. समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांची नावंही ही शिष्यवृत्ती लाभार्तीमध्ये आहेत. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून जीआरमध्ये नवी अट घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याचा फटका खरे गरजू असणारे गरीब मागासवर्गीय विद्यार्थी परदेश शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.

दरम्यान नियमानुसारच आपल्या मुलीची निवड परदेशी शिष्यवृत्तीसाठी झाल्याच स्पष्टीकरण सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिल आहे. तसेच कोणत्याही चौकशीला आपण समोर जाऊ असही त्यांनी सांगितल आहे.