आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकला, कुलभूषण जाधव यांना मिळाला मोठा दिलासा

kulbhushan jadhav

इस्लामाबाद – आज पाकिस्तानी संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक महत्वाचे विधेयक पारित करण्यात आले. या कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानी उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालय (पुनरावलोकन व पुनर्विचार) अध्यादेश, 2020 हा कायदा पाकिस्तानी संसदेने पारित केला आहे. हा नवीन कायदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांसंदर्भात आहे. या नवीन कायद्यानुसार उच्च न्यायालयाला काही अधिकार देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने परदेशी व्यक्तीच्या हक्कांसंदर्भात व्हिएन्नामधील आंतरराष्ट्रीय कराराच्या आधारे परदेशी व्यक्तीला असणाऱ्या कायदेशीर अधिकारांअंतर्गत सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर पाकिस्तानी उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.

कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या कारागृहात आहेत. पाकिस्तानच्या एजन्सीने कुलभूषण जाधव यांना इरान म्हणून पकडलं होतं. कुलभूषण जाधव हे माजी नेवी अधिकारी असल्याच्या मतावर भारत सरकार ठाम आहे. इरानमध्ये कुलभूषण जाधव एका बिझनेस डीलकरता गेले होते. तेथेच त्यांचं अपहरण करून पाकिस्तानच्या लष्कराकडे स्वाधीन करण्यात आलं.

दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

महत्वाच्या बातम्या 

IMP