fbpx

शंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते’

ठाणे – मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण आणि रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, न्यायालयात देखील लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या सत्कार समारोह प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. घणसोलीच्या सेक्टर 7 मधील सिम्प्लेक्स कॉमन मैदान येथे आज सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदींची उपस्थिती होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार नरेंद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर मराठा समाजाच्या युवकांसाठी उचललेल्या पावलांबद्धल मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचा हृदय सत्कार करण्यात आला.