‘आ. जगताप पिता-पुत्रांच्या आदेशावरूनच नगरसेवकांनी केली शरद पवारांशी गद्दारी’

अहमदनगर– अहमदनगर महापालिकेच्या बहुचर्चित महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी- बसपच्या साथीने बाजी मारली. अवघे १४ जागांचे संख्याबळ असताना भाजपचे बाळासाहेब वाकळे हे महापौर ठरले. या निवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी पडद्यामागे घडल्या. युतीतला अबोला, आघाडीतील बिघाडी यासोबतच नगरमधील नातेसंबाधाचे राजकारण कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

Loading...

अहमदनगर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीची युती होऊन भाजपने दोन्ही जागांवर बाजी मारली आहे. दरम्यान,  आ. जगताप पिता-पुत्रांच्या आदेशानुसार नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी गद्दारी केली, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. भाजप जातीयवादी पक्ष आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार भाजप विरोधात कठोर भूमिका घेत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक जवळ आहेत. अशा परिस्थितीत नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला छेद देण्याची जी भूमिका घेतली ती खेदजनक आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

या अभद्र युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हात वर करत या युतीचा आमच्याशी संबंध नसल्याचा पवित्रा घेतला आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला या अभद्र युतीचे शिल्पकार आमदार संग्राम जगताप यांनी देखील आता ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...