मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘गांजाप्रकरणात असलेला अनुभव लक्षात घेऊन वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिक यांना दिली असावी…’, असा खोचक टोला अतुल भातखळकरांनी नवाब मलिक यांना लगावला आहे.
गांजाप्रकरणात असलेला अनुभव लक्षात घेऊन वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिक यांना दिली असावी… https://t.co/fKxOtW4PDl
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 27, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात अनेक वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नवाब मलिकांना खोचक टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
“निःस्वार्थ समाजसेवेच्या व्यसनातून डॉ.अवचट यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले”
“भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित”, टिपू सुलतान वादावरून नवाब मलिकांनी दिला भारतीय संविधानाचा संदर्भ
योगी सरकारच्या काळात दरोड्यांमध्ये ७० तर चोऱ्यांमध्ये झाली ७२ टक्क्यांची घट- अमित शहा
दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा रणंजी करंडक स्पर्धेचे नियोजन
‘सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारला ‘मद्यराष्ट्र’ करू देणार नाही’; भाजप आक्रमक