धोनीच्या सांगण्यावरून सीएसकेमध्ये होणार मोठे फेरबदल; हार्दिक पांड्याला मिळणार स्थान?

धोनीच्या सांगण्यावरून सीएसकेमध्ये होणार मोठे फेरबदल; हार्दिक पांड्याला मिळणार स्थान?

Dhon vs hardik

मुंबई : इंडियन प्रीमियर (IPL) लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत संपायला आता फक्त ४ दिवस बाकी आहेत. बहुतेक आयपीएल फ्रँचायझींनी त्यांची यादी अंतिम केली आहे परंतु अद्याप ती जाहीर केलेली नाही. आयपीएल गवर्निंग काउंसिल आणि बीसीसीआयने फ्रँचायझींना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई कडून खेळताना दिसणार नाही. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आपला कर्णधार रोहित शर्माला कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. मुंबई संघाशी प्रदीर्घ काळापासून संलग्न असलेल्या किरॉन पोलार्डलाही व्यवस्थापनाची होकार मिळण्याची शक्यता असून त्याला कायम ठेवण्यात येणार आहे.

मुंबई संघ जसप्रीत बुमराहला कायम ठेवणार आहे. फ्रँचायझीला सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यापैकी एकाला कायम ठेवण्याचा विचार करावा लागेल. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई कडून खेळताना दिसणार नाही.

अष्टपैलू हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स रिलीज करणार असल्याचे संकेत मिळताच आता चेन्नई सुपर किंग्जचा  कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यासाठी फ्लिंडंग लावायला सुरुवात केली आहे. धोनीच्या हट्टामुळे पंड्यासाठी सीएसके लिलावात बोली लावणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील वर्षीच्या स्पर्धेच्या लिलावात सीएसके आणखी  उत्तम खेळाडूंसाठी बोली लावणार आहे. त्यातच पंड्यासाठीही मोठी बोली लावली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या: