बिबट्याचा अपघाती मृत्यु

यवतमाळ (संदेश कान्हु) : एका दीड वर्षीय बिबट्याला रस्ता ओलांडताना आपल्या जिवाशी मुकावे लागले आहे. यवतमाळच्या अर्णी येथील कोसदनी येथे ही घटना घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धड़केत बिबट्या हा जगिच ठार झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळच्या अर्णी तालुक्यातील कोसदनी घटात एक दीड वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती अर्णी येथील वन परिक्षेत्र अधिकारी डि एस गावंडे यांना आज दुपारी 1वाजता मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले . तेव्हा अज्ञात वाहनाच्या धड़केत बिबट्या जागीच ठार झाला असल्याचे निदर्शनास आले . त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading...Loading…


Loading…

Loading...