fbpx

औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांचा अपघाती मृत्यू

aurangabad accident

औरंगाबाद प्रतिनिधी : मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरधाव वाहनाने जोराची धडक दिली आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. औरंगाबाद जवळील जालना औरंगाबाद या द्रुतगती महामार्गावर केंब्रिज शाळेजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

भागीनाथ लिंबाजी गवळी (वय 56), नारायण गंगाराम वाघमारे (वय 65),दगडुजी बालाजी ढवळे (वय 65), अनिल विठ्ठलराव सोनवणे (वय 45) अशी मृतांची नावं आहेत. औरंगाबाद मधील चिकलठाना परिसरातील हनुमान चौक येथील सर्वजण रहिवाशी होते. सर्वजण सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता अपघात झाला. स्कॉर्पिओ (MH 27, AC 5282) अपघात झाल्याच प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आलं. अपघातानंतर वहानचालक पसार झाला आहे. सर्व मृतदेह श्वविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

2 Comments

Click here to post a comment