जालना : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. इंदुरीकर महाराज हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी निघाले असताना हा अपघात झाला आहे.
लाकडं वाहून नेणाऱ्या एका ट्रॉलीला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ धडकल्याने हा अपघात घडून आला. या अपघातात इंदुरीकर महराज यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ते सुखरूप आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडून आला.
या अपघातात इंदुरीकर महाराज यांचे चालक जखमी झाल्याने पोलिसांनी त्वरित चालकाला परतूर मधील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर इंदुरीकर महाराज यांना पोलिसांनी दुसऱ्या वाहनाने कीर्तनासाठी रवाना केले. .
महत्त्वाच्या बातम्या :