जालना : समृद्धी महामार्गालगत कामगारांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये भरधाव हायवा घुसल्याने झोपेत असलेल्या दोन कामगारांचा चिरडून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना निधोन्याजवळील आंबेडकरवाडी परिसरात रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.
निधोना-आंबेडकरवाडी शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्यांना रात्री झोपण्यासाठी व आराम करण्यासाठी महामार्गालगत पत्र्याचे शेड उभारलेले आहेत. हे कामगार परराज्यातील असून दिवसभर महामार्गाचे काम करून रात्री या पत्र्याच्या शेडमध्ये झोपतात.
रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास महामार्गाच्या एक भरधाव हायवा महामार्गालगतच्या या शेडमध्ये घुसला. यावेळी गाढ झोपेत असलेले कामगार हायवाखाली चिरडले गेले. यामध्ये मुकेश गोरेलाल भूमिया (२४), धनीलाल छकू भूमिया (२६, दोघे रा. करेला, जि.बरेला कठणी, मध्य प्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोविड सेंटरमध्ये रूम देण्याच्या कारणावरून रुग्णांची नोडल अधिकाऱ्यांना मारहाण
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- तर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू-जिल्हाधिकारी