प्रवीण कुमारच्या आईचा अपघात

भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दिली जोरदार धडक

वेब टीम : क्रिकेटपटू प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा काल गंभीर अपघात झालाआहे . मेरठ मधील बागपत रोडजवळ हा अपघात घडलाय. भरधाव वेगानं जाणाऱ्या एका कारनं मूर्तीदेवी यांना जोरदार धडक दिली.

मेरठच्या मुल्तान नगरमध्ये राहणाऱ्या प्रवीण कुमार याच्या आईची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. त्यांना केएमसी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. प्रवीणचा भाऊ विनय कुमारनं दिलेल्या माहितीनुसार, वडील सकत सिंह आणि आई मूर्तीदेवी या देवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परत घरी येत असताना मागून सुस्साट येणाऱ्या कारनं मूर्तीदेवी यांना जोरदार धडक दिली .या अपघातानंतर मुर्तीदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत .या अपघातानंतर गाडीचालक फरार झाला असून पोलीस या कारचालकाचा शोध घेत आहेत

You might also like
Comments
Loading...