नाशिकच्या के. के. वाघ कॉलेजजवळ अपघात, दोघे ठार

accident

नाशिक : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील के.के.वज व बळी मंदीरा परिसरात तवेरा कार गॅस टॅँकरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मालेगावकडे जाताना हा अपघात घडला. या अपघातात पुवकिसन गगराणी व तवेरा चालकाचा जागीच मृत्यू झाला तर देवकिसन गगराणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कनार्टक मधील भारत गॅसचे क्रमांक के.ए.०१ एक्यू २०६६ वाहनास मागून आलेल्या तवेरा कार क्रमांक ४१ एएम ९१९१ ने धडक दिली. टॅँकरला भरधाव कारने दिलेली धडक एवढी भीषण होती की चालकाच्या बाजूने कारचा संपूर्ण भाग कापला गेला.धडक इतकी भीषण होती की या परिसरात याचा मोठा आवाज झाला होता. यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती.