fbpx

VIDEO: दगडूशेठ गणपती देखाव्याच्या कळस काढताना कामगार कोसळला

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकांची तयारी मोठ्या जोमाने सुरु आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाकडून देखील विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्यात येत आहे. मात्र काल पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुख्य मंडपाच्या एका बाजूचा कळस काढताना.एक कामगार वरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

दगडूशेठ गणपतीच्या मुख्य उत्सव मंडपाच्या देखाव्यात तीन कळस आहे. त्यातील दत्त मंदिराच्या बाजू जवळील कळस क्रेन च्या साहायाने काढण्यात येत होता. मात्र कळस निघाल्यानंतर काही समजण्याच्या आतच संबंधित कामगार मंडपाच्या बाजूच्या पत्र्यावर पडला. त्यानंतर तो तसाच खाली कोसळला. दरम्यान तात्काळ त्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार करण्यात येत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांकडून देण्यात आली आहे.

1 Comment

Click here to post a comment