fbpx

डॉन शहांना कोल्हापूरात फिरू द्यायचे असेल तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा

कोल्हापूर : साखर कारखानदार शेतकऱ्याला एफआरपी देत नाहीत. कमी दरात वीज खरेदी शेतकऱ्यांना महाग दरात विकतात त्याचा हिशेब करण्याचे नाकारतात. तुमचे डॉन अमित शहांना कोल्हापूरात फिरू द्यायचे असेल तर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा.” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात दिला आहे. कोल्हापूर येथे शाहू मार्केट यार्डात शेतकरी मेळावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

साखर कारखानदार शेतकऱ्याला एफआरपी देत नाहीत. कमी दरात वीज खरेदी शेतकऱ्यांना महाग दरात विकतात त्याचा हिशेब करण्याचे नाकारतात. वाढीव वीज दरवाढ रद्द करावे या मागणीसाठी येत्या 21 जानेवारीला शिरोली पुलाजवळ महामार्ग रोको करण्यात येणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने सहभागी होईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे गांभिर्य सरकारला समजण्यासाठी आंदोलन तीव्रच करावे लागेल.” असेही यावेळी शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे, खतावर जीएसटी लावला आहे. उत्पादन घटत होत आहे, शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्याजोडील वीज दरवाढीचे संकट शेतकऱ्यावर आहे. त्या विरोधात शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे खासदार राजू शेट्टी म्हणले.