शिक्षणातील बदलांचे आव्हान स्वीकारा-मुख्यमंत्री

cm devendra fadanvis

नागपूर-  आधुनिक तंत्रज्ञानाशी फ्रेंडली असणारी तरुणी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल अपेक्षित आहेत. बदलांचे हे आव्हान स्वीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरातील लिबरल एज्युकेश सोसायटीद्वारे संचालित हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Loading...

यावेळी केंद्रीय मंत्री नितीनगडकरी, वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षणातील बदल स्वीकारतांना या शाळेने अनेक विद्यार्थी घडवलेत.तंत्रज्ञान बदलत असताना त्याला अनुरूप असे बदल शिक्षणात प्रतिबिंबीत होण्याची गरज आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या 62 हजार शाळांनी डिजिटलाझेशनच्या माध्यमातून प्रगती साधली आहे.गेल्या तीन वर्षात शिक्षण व्यवस्थेतील बदलांमुळे राज्याने 18 व्या क्रमांकावरून तिसरा क्रमांक गाठला आहे. जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप बदल होत आहेत. या बदलत्या व्यवस्थेनुरूप पिढी निर्माण करण्यासाठीशैक्षिण बदलांचा स्वीकार करणे क्रमप्राप्त ठरते. हडस हायस्कूलने या बदलांचा स्वीकार करून आदर्शप्रस्थापित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सामान्य शिक्षकांच्या पुढाकारातूनआकाराला आलेल्या हडस संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केला आहे. या संस्थेतव्यावसायिकीकरणाला थारा नसून शिक्षण, त्याग आणि चारित्र्य या त्रिसूत्रीवर संस्थेची वाटचाल सुरू आहे. वर्तमानात नगपूर शहरामध्ये 38 अभियांत्रिकी महाविद्यालये असून सिम्बॉसिस सारख्या संस्थेची इमारतइथे आकाराला येते आहे.

नजीकच्या काळात अनेक मोठ्या कंपन्या, उद्योग नागपूर, विदर्भात सुरूहोणार आहेत. त्यामुळे त्यासाठी स्किल्ड मनुष्यबळाची गरज भासणार आहे. रोजगाराची ही संधी प्राप्तकरण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळनिर्माण करण्याची जबाबदारी शाळांवर आहे. हे व्हान पेलण्यासाठी आधुनिकतेची कास धरणे क्रमप्राप्तअसल्याचे गडकरी यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. काकोडकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.Loading…


Loading…

Loading...