चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंना क्लीनचिट

मुंबई : चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लीनचिट मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यासंदर्भातील फाईलही बंद केली आहे. तसा अहवालनच गृहविभागाला पाठवण्यात आला आहे.

 

पंकजा मुंडेंनी अधिकारांचा वापर करुन अंगणवाडीसाठीच्या वस्तूंसाठी नियम धाब्यावर बसवले. एकाच दिवशी अनेक जीआर काढून 206 कोटींच्या वस्तूंसाठी 24 कंत्राटं दिली, असा आरोप पंकजा मुंडेंवर होता. मात्र, एका दिवसात किती कंत्राटं द्यायची याचा पूर्ण अधिकार संबंधित मंत्री आणि खात्याचा असल्याचं स्पष्टीकरण एसीबीने दिलं आहे.