fbpx

लाच मागणाऱ्या दोन अभियंत्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई

ACB-action-against-MSEDCL-officer-

ठाणे : कोपरखैरणे येथील वीजवितरण कंपनीच्या दोन अभियंत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता मधुकर कांबळे आणि कनिष्ठ अभियंता महेश पाटील अशी या दोघांची नावे आहेत.

या दोघांनी महापे एमआयडीसीतील कंपनीच्या कार्यालयाला नवीन मिटरसाठी लागणारा फिजीबिलीटी रिपोर्ट आणि विजेचा मिटर देण्यासाठी तब्बल ८० हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.