fbpx

अभाविपकडून परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची मागणी

abvp-thumb

टीम महाराष्ट्र देशा –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सुमारे 1000 हून अधिक विद्यार्थांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या, पेपर तपासणी चुकीची तसेच पुनर्मुल्यांकनही चुकीचे केल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून परीक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांची हाकलपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल (एमओएम) या विषयाबरोबर द्वितीय वर्षाचे मॅथेमॅटिक्3, नेटवर्क ऍनालिसिस तर प्रथम वर्षाचा बेसिक मॅथेमॅटिकल इंजिनियरींग या विषयाच्या उत्तर पत्रिकेबाबत ही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. सुरुवातील तक्रारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होती मात्र आता दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत असून एक हजारांहून अधिक मुलांना याचा फटका बसत असल्याचा दावा अभाविपकडून करण्यात आले आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या या दर वर्षी होणाऱ्या हलगर्जीपणाचा विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून सकारात्मकता प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात आता अभाविप ही उतरले आहे.

डॉ.अशोक चव्हाण यांना पदावरुन हटवावे अशी मागणी करत विद्यार्थी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात ठिय्या मांडला आहे. अभाविपच्या मागण्या- – सर्व विद्यार्थ्यांची एसओएम विषयाची उत्तरपत्रिका नवीन नमुना उत्तरपत्रिकेप्रमाणे पुन्हा तपासण्यात यावी. – एसओएम सोबत अभियांत्रिकीच्या अन्य विषयाच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल 48 तासात लावावे. – पुनर्मूल्यांकनचा निकाल 5+ चा नियम न लावता द्यावा, ज्यामुळे एक, दोन गुणांनी विद्यार्थी उनुत्तीर्ण होणार नाहीत. – दरवर्षी विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाच्या या ढिसाळ कारभाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डॉ. अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा.