दिल्ली विद्यापीठावर अभाविपचा झेंडा; एनएसयूआय दुसऱ्या तर आप तिसऱ्या स्थानी

टीम महाराष्ट्र देशा : बहुचर्चित दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटना (डीयूएसयू) निवडणुकीचे निकाल घोषित झाले असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) ३, तर नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या संघटनेला एका जागेवर विजय मिळाला आहे.

डीयूएसयूसाठी १२ सप्टेंबर या दिवशी दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयांमधील ५२ केद्रांवर ४४.६६ टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षी एकूण ४३ टक्के मतदान झाले होते. संघटनेच्या अध्यक्षपदी अभाविपचा अंकिव बेसोया, उपाध्यक्षपदी शक्ती सिंग (अभाविप), सचिवपदी आकाश चौधरी (एनएसयूआय) आणि सह सचिवपदी ज्योती चौधरी (अभाविप) हे निवडून आले आहेत.

या निवडणुकीसाठी दिल्लीतील ५२ केंद्रांवर मतदान झाले होते. प्रचारादरम्यान अभाविप आणि एनएसयुकडून विद्यार्थ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. अभाविपने संघटनेच्या एकूण निधीपैकी ५० टक्के रक्कम महिला व सामाजिक न्यायासंदर्भातील उपक्रमांवर खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. तर एनएसयुने संस्थेला ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’चा दर्जा मिळवून देण्याचे आणि विद्यार्थ्यांसाठी दहा रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करुन देऊ, असे सांगितले होते.

दरम्यान,निवडणुकीतील निकालामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. याचवर्षी झालेल्या दिल्ली निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून इतिहास रचला होता. त्यादृष्टीने सीवायएसएसचे अपयश हे पक्षाच्या घटणाऱ्या लोकप्रियतेचे द्योतक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी स्वत: या निवडणुकीत रस दाखवला होता.

हा विजय सर्वसामान्यांच्या विश्वासाचा-मुख्यमंत्रीLoading…
Loading...