औरंगाबाद : कुलगुरू दालनात तुफान राडा, अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सोमवारी तुफान राडा पहायला मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या दालनातच ठिय्या मांडला. विद्यापीठाच्या वसतिगृहात अनेक लोकं विना अनुमती राहत आहेत त्यांना बाहेर काढा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी कुलगुरूच्या दालनातच तब्बल दोन ते तीन तास ठिय्या मांडला.

दरम्यान, या आंदोलनाला इतर काही संघटनांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे या संघटनांमध्ये कुलगुरूच्या दालनातच धक्काबुक्की झाली. छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह क्रमांक एकसमोर उभ्या असलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे

या होत्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागण्या

  • विद्यार्थिसंख्या मोठ्या प्रमाणात असून, वसतिगृहांची संख्या कमी आहे. यासाठी अभाविपतर्फे संशोधक विद्यार्थी वसतिगृहात नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.
  • प्रवेश नसतानाही अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची हकालपट्टी करावी.
  • वसतिगृहाच्या इमारतींचे आॅडिट करून नूतनीकरण करावे.
  • मुलींच्या वसतिगृहातील बंद सीसीटीव्ही पुन्हा सुरू करावेत.
  • वसतिगृहातील प्रवेशप्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी.
  • स्वच्छता आणि साफसफाई नियमित करावी .
  • मोकाट वराह, जनावरांचा बंदोबस्त करावा.