राज्यात रक्ताचा तुटवडा, अभाविप राबविणार राज्यभरात Blood For Nation अभियान

blood-donation

पुणे : संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. महाराष्ट्रातही कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे, अशा संकटाच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच समाजहिताच्या कार्यामध्ये अग्रेसर असते. या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राज्यभरात "Blood For Nation" या अभियानाच्या माध्यमातून दि २५ मे महाराणा प्रताप जयंती ते २८ मे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती या कालावधी दरम्यान रक्तदान अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे.

अभाविपच्या या रक्तदान अभियानाची माहिती देताना अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी सांगितले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहेत. तसेच सर्व समाजसेवी संस्था, नागरिक, सामाजिक कार्यककर्ते, गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळ यांना रक्तदान करण्याचे आवाहन करणार आहे.

चव्हाण अडकले कोरोनाच्या विळख्यात, ‘या’ मराठी नेत्यांना देखील झाली होती कोरोनाची लागण

या अभियानात सहभागी होऊन जवळच्या रक्तपेढीत किंवा इस्पितळात जाऊन रक्तदान करावे. रक्तदात्याने https://l.ead.me/bbWtkQ या लिंक वर सगळी माहिती भरावी व रक्तदान करतानाचा फोटो #BloodForNation या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडियावर पोस्ट करावी आणि इतरांना ही प्रोत्साहित करावे असे आवाहन प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले आहे.

5 वर्षाच्या विहानने केला एकट्याने दिल्ली ते बंगरूळ असा विमान प्रवास