माकप पुरस्कृत हिंसेच्या विरोधात 11 नोव्हेंबर ला अभाविपचा मोर्चा

देशभरातून पन्नास हजार विद्यार्थी होणार सहभागी

पुणे:- अभाविपच्या कार्यकर्त्यांवर केरळ मध्ये  होणाऱ्या हिंसाचाराविरोधात अभाविप कडून राष्ट्रीय स्तरावर महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.केरळची राजधनी तिरुवनंतपुरम येथे 11 नोव्हेंबर रोजी हा मोर्चा  निघेल. या मध्ये देशभरातून पन्नास हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती अभविपचे संघटन मंत्री राम सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केरळ मधे मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आतापर्यंत अनेक अभविपच्या कार्यकर्त्यांनवर अनेक वेळा हल्ले करण्यात आले आहेत., केरळ मधे माकपची सत्ता आल्यापासुन हल्ल्यांमध्ये वाढच झाली आहे. या हल्ल्यांमध्ये  आतापर्यंत अनेक कार्यकर्ते शहीद झाले आहेत त्यामुळे या संदर्भात निषेध म्हणुन अभाविप या शांती मोर्च्याचे आयोजन करत आहे.. या मोर्च्यात महाराष्ट्र मधुन जवळपास दोन हजार कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी होणार असल्याची माहिती सातपुते यांनी दिली.

You might also like
Comments
Loading...