fbpx

मराठीचा अवमान होत असतांना शिवसेना सत्तेच्या लाचारीपायी गप्प

uadhav thakare .vikhe patil

मुबंई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठीचा अवमान होत असताना शिवसेना सत्तेच्या लाचारीपायी सभागृहात गप्प बसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील कारवाईची मागणी केली. तसेच प्रकारानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे सतर्क झाले आणि त्यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: मराठी अनुवाद केला. पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला.

या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली.

3 Comments

Click here to post a comment