मला पोर्तुगाल ला परत न्या- सालेम

1993 mumbai blast
मुंबई:  मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी अबू सालेम याने युरोपीयन न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाकडे सालेमने पोर्तुगालला परत नेण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा विशेष न्यायालयाकडून सालेमला नुकतेच दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालय उद्या त्याला शिक्षा सुनाणार आहे. याआधीच सालेमने युरोपीयन न्यायालयात धाव घेऊन पोर्तुगालला परत नेण्याची विनंती केली आहे. 2014 साली सालेमचे पोर्तुगालमधून काही अटींसह प्रत्यार्पण झाले होते. त्यावेळी झालेल्या करारानुसार अबू सालेमला फाशी किंवा 25 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकणार नाही. दरम्यान अबू सालेमने युरोपीयन न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, आपल्यावर भारतात बेकायदेशीर कारवाई होत असून, त्याला ठेवण्यात आलेली तुरुंगातल्या जागेचीही तक्रार केली आहे.