बीडच्या राजकारणात दडलय काय ? दहशतवादी अबू जुंदालने आरटीआय अंतर्गत मागवली माहिती

abu-jundal-terrorist

नागपूर: दहशतवादी अबू जुंदाल कारागृहात आहे. तरी त्याच्या कुरापती कमी होत नाहीत. जुंदालने भारतीय कायद्याचा वापर करत, आरटीआय अर्थात माहिती अधिकाराच्या सहाय्याने राजकीय माहिती गोळा करण्याच्या प्रयत्न केला.

दहशतवादी कारवायात सहभागाचा आरोप असलेल्या अबू जुंदालला माहिती दिल्याने देशहिताला बाधा येऊ शकते. न्यायालयात दोषी सिद्ध झालेला, तसंच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दहशतवाद्याला माहिती देणं हे देशहिताच्यादृष्टीने योग्य नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या माहिती अधिकाराचं अपिल फेटाळण्यात आली.

अबू जुंदालने कोणती माहिती मागवली ?

बीडच्या 1980 पासून म्हणजेच त्याच्या जन्मापासूनची निवडणूक माहितीचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे छोट्या छोट्या मोहल्ल्यातील अगदी नगर परिषद/ पालिका निवडणुकीत हरलेले, जिंकलेले अशा सर्व उमेदवारांची माहिती अबू जिंदालने मागितली आहे. तसेच माहिती मागवण्यासाठी 10 रुपयाची स्टॅम्प फी न भरता मी तुरुंगात असल्यामुळे मला दारिद्र्य रेषेखालील समजावे. असेही तो म्हणाला.Loading…
Loading...