स्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता : आझमी

मुंबई : नालासोपारा येथून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह तिघांविरोधात कारवाई करणा-या एटीएसच्या अधिका-यांना संरक्षण देण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी केली आहे. सरकारसह एटीएसने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र हा कट स्वातंत्र्यदिनासाठी नसून बकरी ईदसाठी करण्यात आल्याचा आरोपही आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आझमी यांनी केला आहे.

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमीने दिली आहे.

दरम्यान, वैभव राऊतला पकडल्यावर त्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. उद्या असेच मोर्चे जर मुस्लिम बांधवांनी काढले आणि त्यात ‘देशका नेता कैसा हो’ सारख्या घोषणा दिल्या तर? हे असे होणार असेल तर आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. मनुवाद्यांमुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान होतो आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ नंतर आता राज्यात काँग्रेसची ‘जनसंघर्ष’ यात्रा