fbpx

आई बापासमोर नव्हे मुस्लिमांमध्ये फक्त अल्ला समोर डोकं ठेवतात : अबू आझमी

टीम महाराष्ट्र देशा- वंदे मातरम् म्हणायला काहीही अडचण नाही. मात्र, मुस्लिमांमध्ये फक्त अल्ला समोर डोकं ठेवतात. आई बापासमोर नाही, असे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी त्यांनी म्हटले.आझमी नाशिक येथे आयोजित लोकतंत्र बचाव महारॅलीमध्ये बोलत होते.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून देखील आझमी यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशला जात आहेत, त्यांचे वडील गेले नाही, आणि हे जायचे म्हणतात, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. मंदिराचे मुद्दे निवडणूक काळातच कसे आठवतात, असा प्रश्नही आझमींनी उपस्थितांना केला. कोर्टाने जर अयोध्यामध्ये सांगितले मंदिर करा तर नक्कीच करा. मात्र, न्यायालयाने जर सांगितले मशिद बांधा तर मशिद बांधायला तयार रहा, असे मत देखील अबू आझमी यांनी मांडले.

मंदिरांवर जे राजकारण करत आहेत त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबतचे पत्र न्यायालयाला दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘सारे जहाँसे अच्छा’ असा नारा देणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातील कुणी नव्हते तर ते मुस्लिमच होते, असा टोलाही आझमी यांनी शिवसेनेला लगावला.