‘प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींशी केलेली आघाडी काँग्रेसचंच नुकसान करणारी ठरणार’

टीम महाराष्ट्र देशा- एबीपी माझा वृत्तवाहिनीने मतदारांचा सातत्यानं बदलणारा कल जोखण्यासाठी सीव्होटरच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर करण्यात आले आहेत.भारिप बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या ओवेसींशी केलेली आघाडी काँग्रेसचंच नुकसान करणारी ठरेल या राजकीय विश्लेषकांच्या मतांशी बहुतांश मराठी मतदारही सहमत आहेत.

आंबेडकर-ओवेसी एकत्र आल्यानं दलित-मुस्लिम मतांचं ध्रुविकरण होऊन भाजपला फायदा होईल, असं निम्म्या म्हणजे 49.5 टक्के मतदारांचं मत आहे. तर 43.6 टक्के मतदारांना तसं वाटत नाही.

दरम्यान,देशभरातील मतदारांचा कौल जाणून घेतला असता अनुकूल समीकरणं जुळली तर एनडीएला 300, यूपीएला 116 तर इतर पक्षांना 127 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपसोबत युती केली, तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या 34 जागा मिळतील. तर यूपीएला 14 जागांवर झेंडा फडकवता येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बाळासाहेब कधी उत्तर प्रदेशला गेले नाहीत उद्धव ठाकरे तिकडे जायचं म्हणत आहेत : आझमी

Loading...