कंपन्यांवरील कोरोना सावट दूर, सोमवारपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु ; केंद्राची परवानगी

flights

नवी दिल्ली : कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलतेनंतर अर्थव्यवस्था खुली होत असल्याने प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी पाहता हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हवाई वाहतूक कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच देशांतर्गत हवाई वाहतुकीतील कंपन्यांना चालू वर्षांत १ जून ते ५ जुलैदरम्यान ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान ती ६५ टक्के करण्यात अली. १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान ती ७२.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ८५ टक्के प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणे करण्यास विमान कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या