ठरलं तर ! उदयनराजेंना मिळणार ‘हे’ मोठे पद

udayanraje bhosale speech

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना लवकरच राज्यसभेवर किंवा राज्यात मोठे पद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, शिवसेना व भाजप एकत्रित महायुतीला जनादेश मिळाला आहे. परंतु, काही कलहामुळे जो वाद निर्माण झाला आहे, तो लवकरच संपेल व एकत्रित येऊन महायुतीची सत्ता स्थापन करतील. कारण, उद्धव ठाकरे हुशार असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन सरकार किती दिवस टिकेल, हे त्यांना चांगलेच माहीत आहे.

दरम्यान, दुसरीकडे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना एप्रिलमध्ये भाजप गोड बातमी देणार असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :