रेल्वे प्रश्नाबाबत प्रशासन उदासिन; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली नाराजी!

रेल्वे प्रश्नाबाबत प्रशासन उदासिन; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली नाराजी!

railway

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाअंतर्गत रेल्वे सध्या धावत आहेत. मात्र रेल्वे विभागाचे अनेक प्रश्न अजूनही कायम आहे. अनेकठिकाणी रेल्वेची गरज असताना रेल्वे सोडल्या जात नाहीत. त्यामुळे नांदेड रेल्वे मंडळ ‘मध्य’ रेल्वेकडे हस्तांतरण करावी. अशी मागणी केली जात आहे. मात्र अजूनही मागण्या पूर्ण न झाल्याने खंत व्यक्त होताना दिसत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील याबाबत अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र मागणीला यश न आल्याने अधिकाऱ्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नांदेड रेल्वे विभागाअंतर्गत अनेक रेल्वे सध्या धावतात. परंतु काही रेल्वेची अजूनही गरज आहे. इतकेच नव्हे तर रेल्वेची संख्या वाढवावी, दुहेरीकरण व्हावे, पिटलाईनचा प्रश्न अजूनही कायम आहे. असे असंख्य प्रश्न मार्गी लागत नसेल तर नांदेड रेल्वे मंडळ मध्यला जोडावे अशी मागणी केली होती. यावर सध्या सर्वत्र चर्चा केली जात असून नांदेड मंडळ मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्यात येईल अशा चर्चेला उधाण आले आहे.

असे असले तरी यावर मात्र रेल्वे बोर्डाने अद्यापही कुठल्याही प्रकारचे अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. केवळ सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. अजूनही नांदेड रेल्वे मंडळ मध्य रेल्वेकडे हस्तांतरण व्हावे अशी मागणी कायम असून त्याला आणखी किती वेळ लागेल? असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या