Share

Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; मंदा खडसेंची याचिका फेटाळली

Eknath Khadse | जळगाव :  जिल्हा दूध संघातील निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या उमेदवारीबाबत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदा खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मंदा खडसे यांची ही याचिका फेटाळली आहे. यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे आमदार मंगेश चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मात्र वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आता एकनाथ खडसे विरुध्द भाजप आमदार मंगेश चव्हाण असा सामना यंदाच्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत रंगणार असून यात बाजी कोण मारत हे पाहण महत्वाचं असणार आहे.

पुढील महिन्यात दहा डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यात कायदेशीर लढाई अजून सुरूच आहे. न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर कोणाचे पारडे जड ठरते हे कळणार असले तरी आज मात्र टोकाचा संघर्ष यात पाहायला मिळत आहे.

काय आहे प्रकरण?

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या  विरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांना मुक्ताईनगरमधून निवडणूक लढवता येणार नाही असा दावा एकनाथ खडसेंनी केला . त्यानंतर याविरोधात मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान  खडसेंचा हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. खडसेंचा दावा फेटाळण्यात आल्यानं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Khadse | जळगाव :  जिल्हा दूध संघातील निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या उमेदवारीबाबत एकनाथ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now