फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारा ‘हा’ वेगवान गोलंदाज झाला मुंबईच्या ताफ्यात सामील

blank

टीम महाराष्ट्र देशा  : आयपीएलच्या तेराव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हंगाम सुरू होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना डिसेंबरमध्ये IPL 2020साठी लिलाव होणार आहे.

दरम्यान त्याआधी आयपीएलच्या लिलावासाठी ऑफ सीझन ट्रेड विंडो ही 14 नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळं कोणत्या खेळाडूंना ठेवणार किंवा रिलीज करता येणार यासाठी एका दिवसाचा कालावधी उरला आहे.

दरम्यान, यावर्षीचे देखील अजिंक्यपद पटकाविण्यासाठी मुंबई इंडियन्सने कंबर कसली आहे. IPL मधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स यांनी बुधवारी एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला IPL 2020 साठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. पण या हंगामात दिल्लीने बोल्टला मुंबई इंडियन्सशी ट्रेड केले आहे.

महत्वाच्या बातम्या :