भाजप-शिवसेनेचं ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेनाचं’ भांडण- नितीन गडकरी

मुंबई: शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली तेव्हापासून भाजप मध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजप-शिवसेनेचं ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशा प्रकारचं भांडण आहे. शिवसेने सोबत युती आहे आणि तशीच राहील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केले. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेना पक्षासोबत सोबत युती टिकावी म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. आता त्यात नितीन गडकरी यांनी सुद्धा उडी घेतली आहे. गडकरी म्हणाले, ‘हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आमची युती शिवसेनेसोबत आहे व ती तशीच राहिली पाहिजे. दोन पक्ष एकत्रं आल्यावर मतभेद व भांड्याला भांडे लागण्याचे प्रकार घडतातंच. पण भाजप-शिवसेनेचं ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशा प्रकारचं भांडण आहे. आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर एकत्र होतो, पुढेही एकत्र राहू.’

तसेच ‘साम-दाम-दंड-भेद’ याचा अर्थ ‘सर्व ताकदीने लढा’ असा होतो, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘साम-दाम-दंड-भेद’ या संदर्भात केलेल्या वक्तव्याच स्पष्टीकरण दिले.