ठाण्यात रिक्षा चालकांकडून महिला रिक्षा चालकांना दमदाटी

ठाणे : रिक्षा चालकांकडून महिला रिक्षा चालकांना उद्देशून अश्लील शेरेबाजी केल्याची घटना अबोलीत घडली. रिक्षा चालकांकडून दमदाटी केली जात असते. फक्त महिला प्रवासीच घ्या. स्टॅण्डवर रिक्षा लावायची नाही अशा धमक्यां रिक्षा चालक महिला रिक्षाचालकांना देत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे अबोलीत महिला रिक्षा चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. कॅडबरी जक्शन, गावदेवी, शिवाईनगर, शास्त्रीनगर इत्यादी ठिकाणी शेअर रिक्षा स्टॅण्ड आहेत. तेथे रिक्षा लावण्यास पुरुष रिक्षा चालकांकडून मनाई केली जात असल्याची माहिती एका महिला रिक्षा चालकाकडून देण्यात आली आहे.