fbpx

राहुल गांधीमध्ये पंतप्रधान होण्याची योग्यता – तेजस्वी यादव

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची सर्व योग्यता आहे,असे वक्तव्य राजद पक्षाचे वरिष्ठ नेते तेजस्वी यादव यांनी केले आहे. कॉंग्रेसतर्फे पटना येथील गांधी मैदानात पहिली सार्वजनिक सभा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते.

तेजस्वी यादव म्हणले, जनतेने भाजप सरकारच्या जुमलेबाजीला बळी पडून नये, आम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जातो की, राहुल गांधी हे पंतप्रधान होण्याचे योग्यतचे आहेत का? तर आम्ही सांगतो हो, ते पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांच्यात काहीच कमी नाही.

‘राहुलजी तुम्ही पंतप्रधान झालात तर बिहारकडे विशेष लक्ष द्या कारण बिहार एक गरीब राज्य आहे’. यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात मोठे खोटारडे सांगत त्यांनी बिहारच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.