‘त्यांचा अपेक्षांचा भंग होऊ नये..’बिग बींच्या कौतुकानंतर अभिषेकची प्रतिक्रया

‘त्यांचा अपेक्षांचा भंग होऊ नये..’बिग बींच्या कौतुकानंतर अभिषेकची प्रतिक्रया

Abhishek Bachchan

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) ‘बॉब बिस्वास’ (‘Bob Biswas’) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर बघून त्याच्या भूमिकेबद्दल बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अभिषेकचे कौतुक केले होते. मात्र या चित्रपटातून बिग बींना अपेक्षा असून ‘त्यांचा अपेक्षांचा भंग होऊ नये अशी माझी इच्छा आहे,’ असे अभिषेकने प्रतिक्रयेत व्यक्त केले आहे.

दरम्यान अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॉब बिस्वास’ चा  ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. दरम्यान अभिषेक म्हणाला, “माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला कोणत्याही परिस्थितीत मोडायचा नाही,” तसेच , “मी भारावलो आहे आणि यापुढेही असेन. मी त्यांचा मुलगा आणि सर्वात मोठा चाहता आहे. तुमच्या सर्वात आदर्श व्यक्तीला कामाची जाणीव असणे, त्यांनी तुमचे काम पाहणे हीच एक कौतुकाची थाप आहे. जर तुम्ही चांगले काम करत असाल तर ते तुम्हाला एकटं सोडतात आणि त्यांना वाटते की मी चांगले काम करत आहे, असे त्याने सांगितले.“बॉब बिस्वास’ या चित्रपटाकडून त्यांना फार अपेक्षा आहेत. त्यांचा अपेक्षांचा भंग कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, असे मला वाटते.’

‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटाच्या दोन मिनिटे एकोणचाळीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बॉब बिस्वासचा प्रवास दाखवण्यात आला आहे. बॉब बिस्वास कोमामधून बाहेर येतो आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत असून अभिषेकच्या चाहत्यांसाठी चांगलीच पर्वणी ठरणार आहे.

बिग बी, अभिषेक बच्चन यांचे काही फोटो.

 

 

महत्त्वाच्या बातम्या