अभिषेक बच्चनही झाला कोरोनामुक्त ; तब्बल २८ दिवसानंतर केली कोरोनावर मात

abhishek bachhan

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्याला नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर अभिषेक याने एक ट्विट करून याची माहिती दिली आणि चाहत्यांचे, डॉक्टरांचे, रुग्णालय कर्मचारी वर्गाचे आभार मानले.

11 जुलै रोजी बॉलिवूड महानायक म्हणून ओळखले जाणारे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर २८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांचे आभार मानले आहेत.

याआधी अभिषेक बच्चन यांची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांनी कोरोना वर मात केली होती. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला होता .आता तब्बल 28 दिवसानंतर अभिषेक बच्चन यानी कोरोना वर मात केल्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अभिषेकने ट्वीट केले की, ‘वचन वचन आहे. आज दुपारी माझी कोविड चाचणी निगेटीव्ह आली आहे. मी तुम्हाला म्हणालो होतो की मी कोरोनाला हरवेन. मी आणि माझ्या कुटुंबासाठी केलेल्या सर्व प्रार्थनांबद्दल धन्यवाद. नानावटी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचे खूप आभार. ‘

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’