पाकिस्तानने केला भारताच्या विंग कमांडर अभिनंदनचा अवमान, वर्ल्डकपच्या जाहिरातीत केला वापर

टीम महाराष्ट्र देशा : येत्या १६ तारखेला विश्वचषकातील भारत – पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामन्याची जबरदस्त जाहिरात केली जात आहे. मात्र पाकिस्तान ने पातळी सोडणारी जाहिरात तयार केली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील नेटकरी मंडळींनी याबाबत निषेध व्यक्त केला आहे.

Loading...

या जाहिरातीमध्ये पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याची भूमिका करणारा एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना टाळाटाळ करत आहे. तसेच व्यक्ती चहा पिताना दाखवण्यात आली आहे.यानंतर जाहिरातीमधील अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला तिथून जाण्यास सांगितलं जातं. ती व्यक्ती चहाचा कप घेऊन तिथून जाऊ लागते. तितक्यात त्या व्यक्तीला कप घेऊन कुठे चाललास, असा प्रश्न विचारण्यात येतो. या ठिकाणी चहाच्या कपचा आधार घेत वर्ल्डकपवर भाष्य करण्यात आलं आहे.
दरम्यान पाकिस्तान संघ भारतीय संघाला एकदाही विश्वचषकात हरवू शकला नाही. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत सहावेळा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. मात्र सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे.

 Loading…


Loading…

Loading...