Breaking :अभिनंदन वर्धमान यांच्याबाबत मोठी बातमी,तडजोड करायला पाकडे तयार

नवी दिल्ली :भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘भारतीय वैमानिकाची सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलानं तडजोड करायला तयार आहे,’ असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. याबाबत पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

दरम्यान,काल पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारताचा विंग कमांडर अभिंनदन वर्धमान यांना भारताच्या ताब्यात द्या तसेच त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उपउच्चायुक्त सय्यद हैदर यांना चर्चेसाठी बोलावल होतं.

भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे  पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे कळताच देशाच्या सामाजिक स्तरातून अभिनंदनला भारतात आणा अशी मागणी होत आहे.तर ट्विटरवर #BringBackAbhinandan ट्रेंड होत आहे. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील अभिनंदन वर्धमानला भारतात आणण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकणं सुरु केलं आहे.