fbpx

भारताचा ढाण्या वाघ अभिनंदन वर्धमान पुन्हा सेवेत दाखल

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानचे F-16 फायटर विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सूरतगडच्या एअर फोर्स तळावर पोस्टिंग करण्यात आली आहे. अभिनंदन वर्धमान दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सेवेत दाखल झाला आहे. राजस्थानच्या सुरतगढ येथे त्याचं पोस्टिंग करण्यात आलं असून त्याआधी काश्मीरला जाऊन त्याने आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे.

बालाकोट एअरस्ट्राइकनंतर २७ फेब्रुवारीच्या सकाळी काश्मीरमध्ये झालेल्या डॉगफाइटमध्ये अभिनंदन यांनी पाकचे F-16 पाडले. त्याचवेळी त्यांचे मिग-२१ बायसनही कोसळले. अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. ६० तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. आता दोन महिन्यांनंतर अभिनंदन ठणठणीत बरा झाला असून पुन्हा राजस्थानात सेवेत रुजू झाला आहे. याआधी एकदा बिकानेर येथे त्याचं पोस्टिंग झालं होतं.