अभिजीत कटके ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

टीम महाराष्ट्र देशा: कुस्ती क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके आणि  साताऱ्याच्या किरण भगत यांच्यात अंतिम सामना झाला. पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला चीतपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

अभिजित कटके आणि किरण भगत यांच्यातील अंतिम लढत सुरवातीला अटीतटीची झाली. मात्र अभिजित कटकेने किरणला चितपट करत 10 विरुद्ध 7 गुणांची आघाडी घेत विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.

ही स्पर्धा पुण्यातील भूगावच्या मामासाहेब क्रीडानगरीत भरवण्यात आली होती.

abhijit-katake-becomes-maharashtra-kesari-2017-beat-kiran-bhagat-

अंतिम सामन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही हजेरी लावली होती.

Abhijit Katke And Kiran Bhagat Will Fight For The Prestigious Maharashtra Kesari Wrestling In Final Match#MaharashtraKesari #महाराष्ट्रकेसरी #अभिजीतकटके

You might also like
Comments
Loading...