fbpx

उदयनराजेंच्या मनात धडकी भरवणार तो उमेदवार लोकसभेच्या मैदानात, सांगलीतून उमेदवारी अर्ज दाखल

abhijeet bichkule 1

सांगली: राजकारणात भल्या भल्यांना धडकी भरवणारे खा उदयनराजे भोसले यांनी आपण एका व्यक्तीला भीत असल्याचं मागील वर्षी सांगितले होते. आता इतरांना पळताभुई थोडी करणारे उदयनराजे कोणाला तरी भितात म्हंटल्यावर सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. हि व्यक्ती म्हणजे साताऱ्यातील कवी अभिजित बिचुकले. याच बिचकुलेंनी आजवर नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंत प्रयत्न केले आहेत. आता बिचकुले हे अपक्ष उमेदवार म्हणून सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

नगरसेवक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंतची निवडणूक लढवण्याच्या निर्धारांमुळे बिचकुले हे सातारा जिल्ह्यात कायम चर्चेत असतात. आता सांगली लोकसभेसाठी अर्ज दाखल करताना अभिजितने अनामत रक्कम म्हणून भेट २५ हजारांची चिल्लर भरली आहे. दोन पिशव्या भरुन 25 हजार रुपयांची चिल्लर बिचुकलेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. यावेळी निवडणूक अधिकारी देखील हवालदिल झाले होते.

बिचकुलेंनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत, मात्र एकही निवडणुकीत यश आलं नाही. मात्र आजही त्यांनी आपले प्रयत्न थांबवलेले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागा लढून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपणच ठरवणार, अशी गर्जना देखील या पठ्याने केली होती.

1 Comment

Click here to post a comment