अभाविपचा अनोखा सेवा उपक्रम; मुळशीतील वनवासी कुटुंबांसोबत केली दिवाळी साजरी

abvp pcmc

पुणे : यंदा सण-उत्सव साजरे करण्यावर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्बंध आले आहेत. गणेशोत्सव, ईद, दसरा, यासोबतच सर्व धर्मिय सणांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्व सण साधेपणाने व खबरदारीच्या साजरे करावेत असे आवाहन प्रशासनाने केले होते.

याच कोरोना परिस्थिती मुळे दिवाळी साजरी न करू शकणाऱ्या शहरी जीवनापासून दूर असलेल्या डोंगर भागात निवास करीत असलेल्या कुटुंबांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीने मुळशी तालुक्यातील माले या गावी दिवाळी सेवा उपक्रम करण्यात आला. त्यामुळे ज्यांच्या घरात दिवाळी साजरी करायची तरी कशी असा उद्विग्न सवाल असलेल्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद देखील दिसून आला.

यावेळी, लोकवस्तीस भेट देऊन नागरिकांना मास्क लावणे, हात वेळोवेळी धुण्याचे आव्हान करून वनवासी कुटुंबाना दिवाळी फराळ देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या सोबतच कपडे, आणि शिधा वाटप करण्यात आले.या उपक्रमात पिंपरी-चिंचवड नगर विस्तारक अशोक सैनी, ज्योतिष चौधरी, पुणे जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर, सह संयोजक ऋषि विढोळे, महानगरमंत्री तेजस चवरे, मुळशी तालुका प्रमुख ओमकार जमादार,संभाजी शेंडगे, दामिनी प्रधान, वैभव बिरंगल, मानसी जाधव उपस्तिथ होते.

महत्वाच्या बातम्या