विद्यापीठाच्या भोंगळ कारभारा विरोधात ‘अभवीप’चे आंदोलन

abvp in pune uni .

पुणे /संदीप कापडे: संस्कृत विभागात पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यास क्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर विद्यापीठाकडून प्रवेश नियमात बदल करण्यात आले होते. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने आज विद्यापीठात निषेध व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने 13 विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध करताना हलगर्जीपणा केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विभागातील पदव्युत्तर पदवी व पदविका प्रवेशासाठी दहावी व बारावीला संस्कृत विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाचा प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठाकडून प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर अशी अट ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विविध शाखेत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ३५० रुपये शुल्कभरून अर्ज केले. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांनी कुलगुरांना निवेदन देऊन सुद्धा कुलगुरू कडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली. त्यामुळे अभवीप आज आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठात आंदोलन केले तसेच कुलगुरूंच्या दालनासमोर निषेध व्यक्त केला.

या संदर्भात अभवीप विद्यापीठ प्रमुख श्रीराम कंधारे यांच्या सोबत संवाद साधला असता ते म्हणाले, कुलगुरूंना निवेदन देऊन सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नाही. जर विद्यापीठाने दखल घेतली नाही तर आम्ही विद्यापीठावर विद्यार्थ्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करणार आहोत. झालेल्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून येत्या 24 तासात निर्णय घेऊ असं कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले आहे .