‘विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत द्या’ म्हणत पहिल्याच दिवशी अभाविपचं आंदोलन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये बंद होती. आता दीड वर्षांनी महाविद्यालये सुरु झाली आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी दोन डोस बंधनकारक असल्याचा नियम लागू करण्यात आला आहे. पुण्यात स.प. महाविद्यालयाबाहेर आज पहिल्याच दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाने फी मध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी घोषणाबाजी आणि झेंडे घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी. तसेच हप्त्याने भरण्याची परवानगी द्यावी. या मागण्यांसाठी आम्ही प्राचार्य यांच्याकडे गेलो होतो. पण ते सांगतात हे आमच्या हातात नाही. मग तुम्ही या खुर्चीवर कशाला बसले आहात? असा प्रश्नही विदयार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट सुरु आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्यात यावी. यासाठी आंदोलन करत आहोत. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता पुण्यात मराठवाडा, विदर्भ, इतर जिल्ह्यातून असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. पुण्याकडे विद्येचे माहेरघर म्ह्णूनच पहिले जाते. या माहेरघरात मध्यवर्ती भागात असणाऱ्या सर परशुराम (SP) महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना अशी वागणूक मिळते. हे योग्य नाही असे विद्यार्थांनी यावेळी सांगितले आहे, असं आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या