मुंबई साकीनाका घटनेच्या पार्श्वभूमीवर अभाविपकडून ‘आघाडी’ सरकारचा निषेध!

aghadi sarkar

औरंगाबाद : मुंबई मधील साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ अभाविप डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर शाखेच्या वतीने मुख्य प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महिलांची सुरक्षा हा मुद्दा महत्वपूर्ण झालेला असून यासंदर्भात कड़क कायदा निर्माण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रात वाढत असलेले महिलांवरचे अत्याचार ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा प्रवृत्तीला आळा बसेल व अशा घटना पुन्हा होणार नाहीत किंबहुना तसे धाडस सुद्धा कोणी करणार नाही कायद्याचा वचक व धाक निर्माण झाला पाहिजे त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने पावले उचलावीत असे अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी आव्हान केले. मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरली असून या प्रकरणी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यांनी शनिवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशीही या प्रकरणाबाबत चर्चा केली. याबाबत महानगर सहमंत्री स्नेहा पारिख यांनी सुद्धा रोष व्यक्त करून घटनेचा जाहीर निषेध केला. व आरोपींना कठोर शिक्षा देऊन न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा केली. पीडित मृत निर्भयाला कॅन्डल मार्च काढून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ऋषिकेश केकान, श्यामसुंदर सोडगीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या