चाळीस हजार कोटींच्या निधीचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारच्या ४० हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. कर्नाटक मध्ये एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असा खळबळजनक दावा केला.

त्यानंतर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु झाली असून ते भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, हा मुद्दा आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार हेगडेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सत्तार म्हणाले, जर महाराष्ट्राला मिळालेला निधी फडणवीसांनी केंद्राकडे परत पाठवला असेल तर हे क्लेशदायक आहे. त्यामुळे हे प्रकरण आम्ही आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडू असं त्यांनी म्हटलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला राज्यात ४० हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी शपथ विधीचे नाटक करणे हा केवळ महाराष्ट्रातील जनतेवरच नाही तर इतर राज्यातील जनतेवरही हा अन्याय आहे. जर ४० हजार कोटी पुन्हा केंद्राकडे गेले असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल. अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...