शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा

औरंगाबाद : शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल सत्तार यांच्यासह इतर 32 जणांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

[jwplayer qO9iZPhR]

अब्दुल सत्तार औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार आहेत. सिल्लोडमधील एका शेतकऱ्याला शेतात जाऊन मारहाण केल्याचा आरोप त्या शेतकऱ्याने केला होता. त्यानुसार सत्तार यांच्यावर ही कारवाई झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 12 जून रोजी ही घटना घडली होती.  व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार त्यांच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्ते शेतात घेऊन गेलेले दिसत आहेत. तसंच त्यावेळी बाचाबाची झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं आहे

[jwplayer qO9iZPhR]